पुण्याच्या भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवलीय.वाहनांची तोडफोड केलेल्या ठिकाणीच आरोपींची धिंड काढून त्यांना चोप दिला.भोसरीमधील आदिनाथनगर परिसरात रविवारी मध्यरात्री 12 ते 13 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह चार आरोपींना ताब्यात घेतलं.. त्यानंतर आता त्यांची धिंड काढत अद्दल घडवलीय..