भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं मोठे निर्णय घेतलेत,पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद केला आहे. भारताची अनेक विमाने ही पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास करत अन्य देशांत पोहोचतात. मात्र पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारताच्या एकाही विमानाला पाकिस्तानातील मार्गाने प्रवास करता येणार नाही. पाकिस्तानातील भारतीय नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत..तर वाघा-अटारी बॉर्डरही पाकिस्तानकडून बंद करण्यात आलंय.