पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं परदेशी राजदुतांची बैठक बोलावून चर्चा केलीय. भारताने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्याआधी भारतानं राजदुतांसोबत चर्चा केलीय. तर दुसरीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाहा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेत हल्ल्याबाबत चर्चा केलीय.तर तिसरी घडामोड म्हणजे भारतानं पाकिस्तानचा जबरदस्त बंदोबस्त केलाय.अरबी समुद्रात क्षेपणास्त्र नष्ट करणाऱ्या आयएनएस सूरत या युद्धनौकेची चाचणी करण्यात आलीय.भारतानं पाकिस्तानविरोधात पाच कठोर निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननं समुद्रात क्षेपणास्त्राची चाचपणी करण्याची तयारी सुरु केली होती. त्याआधीच भारतानं चाचणी करुन ठोस उत्तर दिलंय.