मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही तासांतही मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहराला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.