डाव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केलेल्या सामंजस्य कराराने विदर्भात तब्बल 94 हजार कोटींची गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून विदर्भात किमान 10 हजारावर नोकऱ्या आणि या शिवाय अन्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यात सर्वात मोठी 42 हजार 535 कोटी रुपयांची गुंतवणूक वरदान लिथियमद्वारे होणार आहे. साठ हजार टन रिफायनिंग क्षमतेच्या या एकट्या लिथियम रिफायनिंग प्रकल्पामुळे पाच हजारावर नव्या नोकऱ्या निर्माण होणार असल्याची माहिती आहे. कंपनीच्या झिम्बाब्वे येथे लिथियम खाणी असून रिफायनिंग याकरिता बुटीबोरी येथे पाचशे एकर जागा निश्चित केली आहे.