नालासोपारा पूर्वेकडील ब्रिजखाली रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची विशेष गैरसोय झाली असून, पाण्याखालील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. दरवर्षी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नालेसफाई, जलनिस्सारणाची क्षमता वाढवणे आणि पावसाचे पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या परिसरातील पाणी सध्या ओसरले आहे.
Nalasopara Rain | Waterlogging in Nalasopara exposes drainage system flaws; residents face hardship.