नंदुरबार बाजार समितीच्या सीसीआय केंद्रावरती जागा नसल्यामुळे मागील आठ दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र आता कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. सीसीआय खरेदी केंद्रांवरती पहिल्याच दिवशी जवळपास दोन हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. त्यामुळेच कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र तरीही सीसीआय केंद्राद्वारे यावर्षी जवळपास दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक कापसाची खरेदी झाली आहे.