बुरखा परिधान करून दोन चोरटे चोरीच्या उद्देशानं एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात शिरल्यानं दोघांनाही जमावाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरराज शहरात समोर आली आहे. जटवाडा रोड वरील सईदा कॉलनीत हा सगळा प्रकार घडला आहे. आपल्या घरात चोर घुसल्याची बाब घरातल्या एका महिलेच्या लक्षात आली आणि तिनं आरडाओरड केली.