नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला छळाच्या प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेख याने काल न्यायालयासमोर त्याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.....त्याला खरच जेलमध्ये मारहाण झाली का ? केली तर का केली ? मारहाण करणारे ते कैदी कोण ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असतानाच शफी शेखला कारागृहात कोणतीही मारहाण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे.....