नवी मुंबईच्या उलवे परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे... एका लॉजमध्ये 23 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या केल्यानंतर 24 वर्षीय प्रियकरानेही त्याच खोलीत गळफास घेतला.. उलवे सेक्टर 9 मधील हॅपी रेसिडेन्सी लॉजमध्ये गुरुवारी पहाटे ही घटना समोर आली..
अक्षिता चौधरी असं मृत तरुणीचे नाव असून भारत भारद्वाज उर्फ गौरव असे मृत तरुणाचे नाव आहे.. या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.