पुण्यातील कार्यक्रमाला अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते गैरहजर होते. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळ्याला त्यांचेच प्रमुख नेते गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. या नेत्यांना निमंत्रण नव्हत की त्यांच्या मनात काय वेगळं शिजतयं असा सवाल शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उपस्थिते केलाय. दरम्यान या चर्चेवर सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. कार्यक्रमाची जागा मर्यादित असल्याचं तटकरेंनी सांगितलंय