ऊसदराच्या मागणीसाठी सोलापूरसह धाराशिवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय.सोलापुरातील ऊस उत्पादक, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत
तोडगा निघाला नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजू शेट्टींचं आंदोलन सुरू आहे. पहिली उचल 3500 रुपये मिळावी अशी मागणी या आंदोलकांनी केलीय. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आळणी पाटी येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक तब्बल सहा तास ठप्प झाली होती. अखेर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.