गेली दोन अडीच दशके विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या चर्चेत असताना आता काही कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विदेशात पाठवण्यात यश मिळवले आहे. देशात कोरडवाहू शेतीतील शेतकऱ्यांना अशा रीतीचे मिळालेले हे पहिले यशस्वी उदाहरण असल्याचा दावा देखील केला जात आहे. याद्वारे, अखेर दलालांना बाजूला सारून विदर्भातील कापूस शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग गवसला आहे असे म्हणता येईल. पाहूया ही ग्राउंड रिपोर्ट.