आता बातमी राज्यातल्या राजकारणातली. कोकण महायुतीमधल्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्म सभा घेत हरणे मधील दगडफेक प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावरती नाव न घेता अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. दगडफेक प्रकरणामधील मुख्य आरोपीचं नाव FIR नाही ही बाब गंभीर आहे. मात्र आरोपींना वाचवणारे मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीत. या खात्यामधील लोकांनी लक्षात घ्यावं असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम यांना थेट इशारा दिला होता. नितेश राणेंच्या इशाऱ्यावरती योगेश कदमांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.