उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात माघी पौर्णिमेनिमित्त कोट्यवधी भाविक आज अमृत स्नानाचा लाभ घेत आहेत. त्रिवेणी संगमावर भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेत. महाकुंभातलं पाचवं आणि शेवटचं हे अमृत स्नान आज आहे आणि त्यामुळे अगदी रात्रीपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दाटलेली महाकुंभ परिसरामध्ये पाहायला मिळतीये.