देशामध्ये वाघांची शिकार रोखण्यासाठी आता व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. डब्ल्यूसीसीबी ने शिकार रोखण्यासाठी संपूर्ण भारतातील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट जारी केलाय. वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ किंवा डब्ल्यूसीसीबी ही केंद्र सरकारची संस्था आहे. या संस्थेनं गेल्या आठवड्यात देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना रेड अलर्ट दिलेला आहे.