राज्यात अॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी. आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार.अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून पत्रक जारी.राज्यभरातील तपासणीत पनीरचे ३५.४ टक्के नमुने विहित मानकांशी विसंगत आढळल्याने आणि अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे