एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघालंय.संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं ही केली आहेत.सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. याच सर्व प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.