गडचिरोली जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. २०, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी येलो अलर्ट तर २४ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच नदी-नाले ओलांडणे टाळावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, असेही सांगण्यात आले आहे.
Orange Alert for Gadchiroli district on September 24; forecast of rain accompanied by thunderstorms for the next 5 days.