पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांना देश सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रशासनाने पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी महिला असल्याचं समोर आलं आहे.त्यामध्ये दापोलीत दोन तर मंडणगडमध्ये एक पाकिस्तानी महिला आढळून आली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या तिन्ही महिलांचे भारतीय व्यक्तींशी लग्न झालेलं आहे. मात्र या तिघींचाही लॉंग टर्म व्हिसा आहे.दरम्यान दापोलीत आढळलेल्या दोन पाकिस्तानी महिलांमध्ये उरुसा चिकटे ही कराचीमधील असून त्यांनी शहानवाज बटे यांच्याशी विवाह केला आहे.तर आशिया बानू हाजी अन्वर अकबानी या हर्णे येथे पतीसोबत वास्तव्यास आहेत.