पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील पाकिस्तानी दूतावासातील एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात दूतवासात काम करणारा एक पाकिस्तानी कर्मचारी आपल्या कार्यालयात केक घेऊन जात असताना पकडला गेला. माध्यमांनी जेव्हा त्याला या प्रकरणी सवाल केले तेव्हा त्यानं काहीच उत्तर दिलं नाहीय. पाकिस्तानी अधिकारी दहशतवादी हल्ल्याबाबत आनंद व्यक्त करत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.