भाजपचे आमदार परिणय फुके यांनी रोहित पवारांबाबत खळबळजनक दावा केला आहे....रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेण्यासाठीच रोहित पवार भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असल्याचा दावा भाजपचे भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघाचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे....मात्र त्यांच्या दाव्याला रोहित पवारांनी उत्तर दिलंय....परिणय फुकेंनी माझी काळजी करु नये असा सल्ला त्यांनी दिलाय...तर आता सुप्रिया सुळेंनी देकील फुकेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.