मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाच्या तपासावर आपण व्यक्तिश: लक्ष ठेवून आहोत, अशी हमी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आलीय. अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीमध्ये पार्थ पवारांची 99 टक्के भागिदारी असतानाही पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा यापुर्वी 7 सप्टेंरबरच्या सुनावणीदरम्यान केली होती. त्या अनुषंगाने डीजीपींनी न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर करत तपास पुढे सुरू असल्याचे सांगितलं. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने कोर्टाने पुन्हा सरकारी पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. ९९ टक्के हिस्सा असलेल्या कंपनीत कोणाला अधिक फायदा झाला असता? असा सवालही कोर्टानं केलाय. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रात काय आहे, त्यांना व्यवहाराबाबत माहिती नव्हती का? यासारखे प्रश्नही कोर्टाने उपस्थित केलेत.
Mounting trouble for Parth Pawar? Will difficulties increase in the Mundhwa land scam case?