Pune| 3500 AI Cameraद्वारे गणेशोत्सव गर्दीवर करडी नजर,Integrated Command and Control Centerमधून लक्ष

पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये तब्बल ३५०० आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कॅमेरे बसवण्यात आले असून, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून त्यांचे नियंत्रण केले जात आहे. या कॅमेरांच्या मदतीने गर्दीची अचूक संख्या, फेस रेकग्निशनद्वारे गुन्हेगारांची ओळख, तसेच संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय हरवलेली लहान मुले, एकल महिला किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास संबंधित पोलिसांना त्वरित सूचना दिल्या जात आहेत. गणेशोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पुणे पोलिसांचा हा हायटेक बंदोबस्त सज्ज झाला आहे. Pune | Close watch on Ganeshotsav crowds via 3,500 AI cameras; monitoring from the Integrated Command and Control Center.

संबंधित व्हिडीओ