पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झालीय. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि अचूक पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली यांनी दिलेत. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणारेय.. यासाठी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आलीय.