Pune| प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईनेच काढला काटा, पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह माहेरी पाठवला

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय.प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुरड्याची आईनं हत्या केलीय. प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा आईनेच जीव घेतलाय. प्रियकराच्या मदतीनं मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव रचण्यात आलाय. तर पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. दरम्यान मुलाच्या आजोबांना संशय आला.त्यानंतर आजोबांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचं बिंग फुटलं.

संबंधित व्हिडीओ