पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी दगडफेक आणि टायर जाळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.