काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत.. देशातील निवडणुकांमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, असा आरोपही त्यांनी केलाय.. त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र इंडिया आघाडी पराभूत कशी काय झाली? असा सवालही राहुल गांधींनी केलाय..