पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजांवर चीनची मक्तेदारी संपुष्टात येत आहे. चीनसोबतच्या (China) तणावानंतर भारतानेही देशात अशा खनिजांचा शोध वाढवला आहे. राजस्थानमधील (Rajasthan) नागौर येथील देगाना प्रदेशात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे. या खनिजाला पांढरे सोने असेही म्हणतात. हा आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा साठा मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे, भारत सध्या आपल्या लिथियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चीनवर अवलंबून आहे. 70 ते 80 टक्के पुरवठा चीनमधून आयात करतो. इतक्या मोठ्या साठ्याच्या शोधामुळं भारताचे चिनी महाकाय कंपनीवरील अवलंबित्व संपणार आहे.