गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाबाबत सरकार अलर्ट मोडवर आहे. मुंबई-गोवा महामार्गाची आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पाहणी करणार आहेत. रायगडच्या पळस्पेपासून ते पाहणीला सुरूवात करतील.रत्नागिरीपर्यंत शिवेंद्रराजे भोसले महामार्गाची पाहणी करतील. या पाहणीदरम्यान ते ठेकेदारांना काय सूचना करणार आहेत याकडेही लक्ष आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.