आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांची लगबग पाहायला मिळत आहे. कोकणात साडेतीन लाखांहून अधिक मच्छिमार आहेत, तर १४ हजार मासेमारी नौका आहेत. यातील रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नौका आहेत. पण 1 जून ते 31 जुलै असे दोन महिने मासेमारी बंद असते. पाऊस, समुद्रातील वादळं, तसेच माशाच्या प्रजनन कालावधीमुळे दोन महिने मासेमारीवर बंदी असते. पण 1 ऑगस्टपासून यांत्रिक मासेमारी पुन्हा सुरू होते.. त्यामुळे आजपासून पुन्हा मासेमारी सुरू होत असल्याने सर्वच बंदरांवर मच्छिमारांची लगबग दिसून येत आहे. अनेकांनी आपल्या नौकांची पूजा केली आहे. मात्र समुद्रातील वादळी परिस्थिती कायम असल्याने पुर्ण क्षमतेनी मासेमारी हंगाम सुरु होण्यास अटकाव निर्माण झाला आहे.. या सर्व स्थितीचा मिरकरवाडा बंदरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..