झोपलेल्या आणि मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी रोहित पवारांनी केलीय. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडल्याच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.