राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच रोहित पवार पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर आता रोहित पवारांच्या भूमिकेला पक्षातून विरोध होत असल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलंय. या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी न होण्याच्या सूचना पक्षातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना वरिष्ठ नेत्यांकडून फोन गेल्याची माहिती आहे. काँग्रेसही रोहित पवारांच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याची महिती आहे., त्यामुळे रोहित पवार एकाकी पडलेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान रोहित पवार आमच्या पक्षातील नसून काँग्रेस स्वतंत्र आंदोलन करणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय. तर आंदोलन नौटंकी असल्याची टीका नवनाथ बन यांनी केलीय.