रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर रोहित पवारांनीच कोकाटेच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. कोकाटेंना पदावरुन हटवल्यानंतर रोहित पवारांनी ट्वीट केलयं. कोकाटे मागील चुका टाळून क्रीडा खात्याला न्याय देतील ही अपेक्षा असं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावलाय...