विकेंड आणि पावसाळी वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली.. घाटातील धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी जवळपास एक तास वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत.