Rain Alert| मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पाऊस; तर सोमवारी कुठे-कुठे शाळा बंद?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे..उद्या रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.. तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतीय.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. तर पालघर, रायगडमध्ये परिस्थिती बघून सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान पाऊस, पाणी किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत सापडलात तर 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे..

संबंधित व्हिडीओ