आजचा रविवार मुंबईसह राज्यातल्या बहुसंख्य भागांसाठी सुखद ठरला.. कारण राज्याच्या जवळपास सगळ्यात भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.. मुंबई आणि एम.एम.आर. भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे १०३ ठिकाणी झाडे-फांद्या पडल्या. शहर आणि उपनगर १७ ठिकाणी घराचा भाग, भिंती पडण्याच्या घटना घडल्या असून १८ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.