कांदिवली येथील 'सावली बार' प्रकरणी सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबीयांनी बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्याची माहिती समोर आली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.