Sangamner Farmer | दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकार नुकसान भरपाई कधी देणार?

गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील वडाची खोरी परिसरातील मका, ज्वारी,कांदा आणि बाजरी पिकं पाण्याखाली गेली.. नुकतीच काढणीला आलेली बाजरी, कांदा, मका यासारखी पिकं वाहून गेल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय. आधीच पडलेले बाजारभाव आणि त्यात आलेलं हे आसमानी संकट त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाते की काय असा प्रश्न आहे. पंधरा दिवसांवर दिवाळी सण असताना हा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे..

संबंधित व्हिडीओ