वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी शरद पवार हे पूर्णपणे भाजपचे हस्तक असल्याचा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.