Sharad Pawar गट NDA सोबत जाणार- सूत्र; शरद पवारांचा पक्ष INDIA आघाडीसोबतच- Harshwardhan Sapkal

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि एनडीए यांच्यातील संवाद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भाजपच्या एका केंद्रीय नेत्यासोबत बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे.फेररचना विधेयकावर पाठिंबा, केंद्रातील संभाव्य राजकीय भूमिका, तसेच महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. शरद पवारांचा पक्ष इंडिया आघाडीसोबतच असल्याचं हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ