शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांच्या कामांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ हा संपत आलाय त्यामुळे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमंत्री पद देत त्यांची पदोन्नती केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Are major changes in the offing within Shinde’s Shiv Sena? Uday Samant gives his first reaction—what did he say?