गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणारे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली नाईकवाडा येथील नाईक-जुमलेदार कुटुंबीयांनी यंदा कोकणातील पारंपरिक शेतकरी जीवनशैलीवर आधारित आकर्षक देखावा साकारला आहे. पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून उभारलेल्या या देखाव्यात जुन्या काळातील शेतीपद्धती आणि निसर्गाशी असलेलं नातं जिवंत करण्यात आलं आहे. नव्या पिढीला पारंपरिक संस्कृती आणि शेतीची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.