कर्नाटकात कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू असताना महाराष्ट्रातही अशा प्रयोगाची शक्यता आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कृत्रिम पावसाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग फारसे यशस्वी झाले नाहीत.दरम्यान, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा असल्याने शेतीच्या प्रश्नावर अंशतः दिलासा मिळाला आहे. मात्र उजनी धरणाच्या पाण्यावर पुढील वर्षी जूनपर्यंत पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्यात सध्या ५० टँकर सुरू असून उद्या टंचाईबाबत बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Is there a possibility of artificial rain experiments in Maharashtra? What was Jaykumar Gore's response?