सोयाबिन खरेदीला मुदत वाढ मिळाल्याच्या माहिती राज्याच्या पणन विभागानं नाकारली आहे.केंद्र सरकारनं सोयाबिन खरेदीला कोणतीह मुदतवाढ दिलेली नसल्याचं पणन विभागानं काही वेळापूर्वीच स्पष्ट केलंय.माध्यमांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांच्या हवाल्यानं सोयाबिन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची बातमी आजच प्रसारित केली होती. पण अशी कोणतीही मुदतवाढ केंद्रानं दिलेली नसल्याचं आता पणनविभागानं म्हटलंय.