एकिकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची आणि नेत्यांमधल्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीतल्या मित्रपक्षातच आता वाद पेटलाय. शिवसेना शिंदे गटाचे नेते राष्ट्रवादी पक्षाबाबत किंवा राष्ट्रवादींच्या नेत्यांबाबत उलटसुलट वक्तव्य करत असल्याने राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी आहे. महायुतीच्या समन्वय समितीत आपण हा विषय उपस्थित करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीचा गोंधळ दिसतोय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...