ST ची पार्सल सेवा दोन महिन्यांपासून ठप्प, Parcel Service बंद पडल्याने ST च्या महसुलाला फटका

आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला आता आणखी एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. एसटीच्या पार्सल वाहतूक सेवेसाठी असलेला ठेका जुलै महिन्यात संपुष्टात आल्यानंतर तब्बल दोन महिने उलटूनही नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी राज्यभरातील एसटीची पार्सल सेवा ठप्प झाली असून त्याचा थेट फटका महामंडळाच्या महसुलाला बसत आहे. दरवर्षी सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न देणारी ही सेवा बंद पडल्याने आर्थिक नुकसान वाढत आहे. दुसरीकडे स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा बंद झाल्याने ग्रामीण भागातील व्यापारी आणि ग्राहकांना खासगी वाहतूक सेवांचा आधार घ्यावा लागत आहे.

संबंधित व्हिडीओ