पुण्यात सुरू असलेल्या रोहित पवारांच्या आंदोलनावरून नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. रोहित पवारांचं आंदोलन पॉलिटिकल स्पॉन्सर्ड प्रोग्राम असल्याची टीका नवनाथ बन यांनी केलीय. रोहित पवारांच्या आंदोलनात फक्त 20 टक्के विद्यार्थी असून बाकीचे बारामतीतील कार्यकर्ते असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केलाय. नवनाथ बन यांनी आंदोलन स्थळाबाहेरील पार्किंगचे व्हिडीओ दाखवत ही टीका केलीय. त्यांच्या या आरोपांवर रोहित पवारांनी उत्तर दिलंय. 'विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातून लोक येतात बन यांचे आयोग तथ्यहीन असून विद्यार्थीच या आरोपांना उत्तर देतील अस रोहित पवारांनी सांगितलंय.दरम्यान रोहित पवारांच्या टीकेला पुन्हा नवनाथ बन यांनी प्रत्यु्त्तर दिलंय.