पुणे शिक्षक मतदार संघात निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर केला, मात्र शिवसेनेकडून मंगेश चिवटे अधिकृत उमेदवारी दाखल करणार आहेत.. चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट शिवसेनेचे स्टार प्रचारक शहाजी बापू पाटील देखील जाणार आहेत. त्यामुळे मंगेश चिवटे यांना पुणे मतदार संघात शिवसेनेच्या नेत्यांचा वाढता पाठिंबा या निवडणुकीच्या राजकारणाला कलाटली देणारा तर भाजपची डोकेदुखी वाढवणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रातून शहाजी बापू पाटील यांनी चिवटे यांना पाठिंबा दिल्यानंतर अनेक नेते पुढे यायला सुरुवात झाली आहे.