ST सेवेला आता मोठं बळ मिळणार, ST च्या ताफ्यात दाखल होणार 5 हजार नव्या 'लालपरी'- Pratap Sarnaik

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या एसटी सेवेला आता मोठे बळ मिळणार आहे... प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने 5 हजार नव्या ‘लालपरी’ बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे... परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली... नव्या बसांमुळे जुन्या आणि वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बसांची समस्या कमी होणार असून ग्रामीण भागातील बससेवेलाही मोठी ताकद मिळणार आहे... तसेच 'मागेल त्याला बसफेरी' ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असून भविष्यात एसटीचा प्रवास पर्यावरणपूरक ई-बसच्या दिशेने वेगाने होणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले...

संबंधित व्हिडीओ